Home Breaking News अर्णव चक्रीवादळाचा धोका; १२ रेल्वेगाड्या रद्द, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा!

अर्णव चक्रीवादळाचा धोका; १२ रेल्वेगाड्या रद्द, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा!

24
0

अर्णव चक्रीवादळाचा धोका; १२ रेल्वेगाड्या रद्द, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा!

नवी दिल्ली, दि. २७ ऑक्टोबर

: बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या अर्णव चक्रीवादळामुळे ताशी १४० ते १५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला सर्वाधिक धोका असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

यावेळी हवेचा वेग प्रति ताशी 140 ते 150 किलोमीटर असणार आहे. तब्बल 12 राज्यांना या चक्रीवादळाचा धोका असणार आहे. तर नऊ राज्यांमध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. या वादळाचा सर्वाधिक धोका आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला बसणार आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशासहीत तेलंगाना, छत्तीसगढ़, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, पूर्व राजस्थान, पश्चिमी मध्य प्रदेश, पूर्व गुजरात तसेच महाराष्ट्र महाराष्ट्रातील काही भागांना या वादळाचा तडाखा बसणार आहे.

संभाव्य धोका लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान १२ एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या विविध तारखांना रद्द केल्याचे वृत्त आहे. यामध्ये संबलेश्वरी, जगदलपूर इंटरसिटी, विशाखापट्टणम–किरंडुल आणि कोरापूट इंटरसिटी एक्सप्रेसचा समावेश आहे. हिराखंड एक्सप्रेसचा प्रवास रायगड स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन १३९ किंवा NTES वर गाडीची अद्ययावत स्थिती तपासावी