कोस्टल रोडवर वेगवान बीएमडब्ल्यूचा (BMW) कहर, ४ जणांचा मृत्यू, १ गंभीर; मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जात होती कार
मुंबईत आज रविवारी भल्या पहाटे मुंबईच्या कोस्टल रोडवर एका बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झाला. कोस्टल रोड कंट्रोल रूमने दिलेल्या माहितीनुसार, एक काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जात असताना अतिवेगामुळे तिचा अपघात झाला.
रविवारी भल्या पहाटे मुंबईतून एक वाईट बातमी समोर आली आहे. येथे एका अतिवेगवान बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत तीन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सकाळी ५:२० वाजताच्या सुमारास कोस्टल रोडवरील लाला कॉलेजसमोर, लोटस जेट्टीजवळ घडला. कोस्टल रोड कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघाताचे कारण अतिवेग असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेनंतर जखमी झालेल्या चारही जणांना उपचारासाठी नायर रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (CMO) दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आणलेल्या चार जणांपैकी तिघांना मृत घोषित करण्यात आले, तर एकावर उपचार सुरू आहेत.

