Home Breaking News दिवेआगरच्या समुद्रात आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; सहल ठरली शेवटची.

दिवेआगरच्या समुद्रात आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; सहल ठरली शेवटची.

23
0

दिवेआगरच्या समुद्रात आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; सहल ठरली शेवटची.

रायगड : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरातील ८ विद्यार्थ्यांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आळंदी तसेच पुणे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आळंदी येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल दिवेआगर येथे पर्यटनासाठी आली होती. समुद्रकिनारी विद्यार्थी आनंद घेत असताना ८ विद्यार्थी अचानक समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
स्थानिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत विद्यार्थ्यांची ओळख पटविण्याची तसेच घटनेचा अधिक तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आळंदी आणि पुणे शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.