Home Breaking News राज्यात मोठे प्रशासकीय  फेरबदल ११वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश.

राज्यात मोठे प्रशासकीय  फेरबदल ११वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश.

38
0
राज्यात मोठे प्रशासकीय  फेरबदल ११वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश.

मुंबई :महाराष्ट्र सरकारने आज प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, एकूण ११ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

 विशेष म्हणजे सात दिवसांपूर्वीच राज्य शासनाने प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांची बदली केली होती. IAS अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती केली होती. तसेच IAS तुकाराम मुंढे यांची देखील बदली करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर सात दिवसांनी आज पुन्हा एकदा राज्यातील 11 वरिष्ठ पातळीवरच्या IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पुणे येथे कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रंजन महीवाल यांची बदली करण्यात आली आहे. पुणे येथे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सदस्य सचिव म्हणून IAS राहुल रंजन महीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे

IAS श्वेता सिंघल नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे विशेष निवासी आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर IAS रुचेश जैवंशी यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. IAS कन्हुराज बागटे यांची कल्याण येथे महावितरणाच्या (MAHADISCOM) संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे सचिवपदी कार्यरत असलेले IAS लक्ष्मण राऊत यांची देखील बदली करण्यात आली आहे. लक्ष्मण राऊत यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई येथे करण्यात आली आहे. तर तिथे कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांची मुंबईत मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कल्याण येथील महावितरणाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप जगदाळे यांची मुंबईत मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. त्यांची मंत्रालयाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे IAS पंकज देवरे यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी IAS मिनल करनवाल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती आता प्रकल्प संचालक म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई येथे करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची देखील बदली करण्यात आली आहे. करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा केळापूर उपविभागाचे ITDP पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी IAS अमित रंजन यांची नाशिक महापालिकेत बदली करण्यात आली आहे. अमित रंजन यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.