पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविधविषयांना मंजुरी.

पिंपरी, दि. ८ एप्रिल २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायीसमितीच्या आज झालेल्या बैठकीत शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांनामंजुरी देण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या याबैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्याया बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. यावेळीस्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषाचिंचवडे,संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेचमहापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विविध केमिकलटाक्यांना सुरक्षा आवरण उभारणे व अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. तसेचप्रभाग क्र. २ मधील मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरात स्थापत्य विषयक कामे, नाल्यांची व पावसाळी चेंबर्सची साफसफाई तसेच चिखली-मोशीभागातील स्वच्छतागृहांची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. ९ मधीलनेहरूनगर व खराळवाडी येथे स्थापत्य विषयक कामे तसेच प्रभाग क्र. २९ पिंपळे गुरवयेथे रोड फर्निचर दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १६ अंतर्गत रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, साईनगर, कोतवालनगर येथे रस्ते दुरुस्ती, महापालिका इमारती, स्मशानभूमी व इतर आवश्यक ठिकाणांची देखभाल-दुरुस्ती करण्यासमंजुरी देण्यात आली. तसेच रावेत येथील इंद्रप्रभा सोसायटी रस्त्यावर रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणारे महापारेषण कंपनीचे १३२ केव्ही क्षमतेचे दोन वीज मनोरेहलविण्यास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १७ मधील महापालिका इमारती व इतर ठिकाणांचीदेखभाल-दुरुस्ती तसेच वाल्हेकरवाडी येथील रस्ते दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरीदेण्यात आली. याशिवाय ग, ड, ब, फ व ईक्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध झोपडपट्टी परिसरांमध्ये (आदर्शनगर, मिलिंदनगर, शास्त्रीनगर, सुभाषनगर, कैलासनगर, महात्मा गांधीनगर, इंदिरानगर, बलदेवनगर, संजय गांधीनगर, तापकीरनगर, आण्णाभाऊसाठे नगर,काळाखडक-म्हातोबानगर, वेताळनगर, विजयनगर, मोरयानगर, एम.बी.कॅम्प,नागसेननगर, भोईरनगर, संतोषनगर, दुर्गानगर, अजंठानगर, राजनगर, सम्राटनगर, सिद्धार्थनगर, मोरेवस्ती, गांधीनगर, बालाजीनगर, शांतीनगर)येथे स्थापत्य दुरुस्ती, गटार वस्टॉर्म वॉटर लाईन टाकणे आदी कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.
महापालिका शाळा, दवाखाने व मुख्य प्रशासकीय इमारतीची देखभाल-दुरुस्ती वफर्निचर कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच क क्षेत्रीय कार्यालयांतर्गतसार्वजनिक शौचालयांची उच्चदाब पाण्याच्या फवाऱ्याद्वारे यांत्रिकी पद्धतीने वमनुष्यबळाच्या सहाय्याने दैनंदिन साफसफाई, देखभाल व किरकोळ दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
याशिवाय, स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत GIS सक्षमERPप्रणालीसाठी व्हर्च्युअल मशिन उपलब्ध करून देण्यास मान्यतादेण्यात आली. आरोग्य विभागांतर्गत नवीन थेरगाव, जिजामाता, भोसरी, तालेरा रुग्णालय तसेच ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटेमेमोरियल हॉस्पिटल येथे कार्यरत तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यास तसेचयशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयांतर्गत शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालयासाठीउपकरण खरेदीस मंजुरी देण्यात आली.
संत तुकाराम महाराज संतपीठासाठी आवश्यक तरतूद वर्ग करणे, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सावित्रीबाई फुले उद्यानातीलउर्वरित विद्युत कामे पूर्ण करणे, अक्षेत्रीय कार्यालयांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुलेजयंतीनिमित्त तात्पुरती ध्वनी व प्रकाश व्यवस्था करणे तसेच प्रभागांतर्गतपाने-फुले-फळे-भाजीपाला स्पर्धा व इतर कार्यक्रमांसाठी तात्पुरती ध्वनीव्यवस्था, सीसीटीव्ही व प्रकाशयोजना करणे आदी विषयांना येणाऱ्याखर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.