पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई – चोरी व घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद २३ गुन्हे उघडकीस.
पुणे : दि.२५एप्रिल २०२६.पुणे ग्रामीण पोलीस दलाने मोठी कारवाई करत चोरी, घरफोडी आणि चैन स्नॅचिंग सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण २३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने:
सुमारे ३२तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मोटारसायकल,इतर मौल्यवान वस्तू असा ४६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा संबंध जोडून तपास करण्यात आला.
या कारवाईदरम्यान:परांडा, दौंड, शिरूर, आळेफाटा, जुन्नर आदी भागातील गुन्हे उघड झाले
आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी व चैन स्नॅचिंग केले असल्याचे स्पष्ट झाले
पोलीसांची भूमिका
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने तपास करून ही यशस्वी मोहीम पूर्ण केली.
महत्त्वच हे की या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार.नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढणार.