Home Breaking News पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई – २१.५२ लाखांचा एम.डी. ड्रग्ज जप्त, तिघांना...

पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई – २१.५२ लाखांचा एम.डी. ड्रग्ज जप्त, तिघांना अटक ,अमली पदार्थ जप्त.

47
0

पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई – २१.५२ लाखांचा एम.डी. ड्रग्ज जप्त, तिघांना अटक, अमली पदार्थ जप्त.

शिरूर: २५एप्रिल २०२६,पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर परिसरात छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत सुमारे ₹२१.५२ लाख किमतीचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. आरोपींकडून हा माल विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी सापळा रचून संशयितांना पकडले. त्यांच्या ताब्यातून अमली पदार्थांसह इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीं, विशाल मोरे, प्रतीक लंगे ,मिथुन विजयपाल सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई नशामुक्त भारत अभियान अंतर्गत करण्यात आली असून, समाजात अमली पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.