Home Breaking News पुणे: कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाची संयुक्त धडक कारवाई!

पुणे: कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाची संयुक्त धडक कारवाई!

36
0

पुणे: कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाची संयुक्त धडक कारवाई!

पुणे: १५ जुलै; सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणे तसेच ड्रेनेज लाईन व नाल्यामध्ये अनधिकृतपणे सांडपाणी सोडून पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या सॅलेसबरी पार्क येथील गोल्डन बेकरी आणि इंडियन बेकरी या दोन व्यावसायिक आस्थापनांवर पुणे महानगरपालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयामार्फत संयुक्त धडक कारवाई करण्यात आली.

तपासणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोन्ही आस्थापनांवर प्रत्येकी ₹२५,००० प्रमाणे एकूण ₹५०,००० दंडात्मक कारवाई करण्यात आली असून हा दंड जागेवरच वसूल करण्यात आला.

ही कारवाई मा. उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग श्री. संतोष वारुळे, मा. उप आयुक्त, परिमंडळ क्र. ०५ श्री. माधव जगताप आणि मा. सहाय्यक आयुक्त, कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय श्री. तिमय्या जगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मा. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. राहुल राजगोळकर तसेच मा. आरोग्य निरीक्षक श्री. अमोल लांडगे, मा. आरोग्य निरीक्षक श्री. तौसीफ देशपांडे आणि मा. आरोग्य निरीक्षक श्री. चंद्रवदन गायकवाड यांच्या पथकाने प्रत्यक्ष स्थळावर जाऊन ही धडक कारवाई केली.

शहर स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्यास बाधा आणणाऱ्या तसेच पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांविरुद्ध पुणे महानगरपालिकेकडून अशा प्रकारच्या कठोर कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील.