पुणे ग्रामीणच्या बारामती, वडगाव मावळ, शिरूर आणि सासवड हद्दीत मारहाण, घरफोडी आणि चोरीच्या घटनांनमध्ये गुन्हे दाखल.

पुणे :१५ जुलै ,पुणे ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मारहाण, घरफोडी आणि चोरीच्या घटना समोर आल्या असून संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बारामती, वडगाव मावळ, शिरूर आणि सासवड पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
बारामती तालुक्यातील बारक गावच्या हद्दीतील शेताजवळ झालेल्या वादातून आरोपी अरुण संभाजी पेंढोळे (रा. बारक, ता. मुळशी, जि. पुणे) याने फिर्यादी सोपान हंडळे (वय ३९) यांना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वादातून मारहाणीचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.
वडगाव मावळ परिसरात कंपनीच्या कार्यालयात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून रोकड आणि मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची घटना घडली.
शिरूर तालुक्यातील बीएसएनएल कार्यालयातही घरफोडी करून लाखो रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याची नोंद आहे.चोरट्याने कार्यालयातील बॅटऱ्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी राजेश बबनराव पाटील ,वय ४३, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याशिवाय सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोठ्यातून म्हशी चोरीला गेल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व घटनांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.