Home Breaking News अजित पवार विमान अपघातात मोठे अपडेट: VSR व्हेंचर्समध्ये अनेक त्रुटी, लिअरजेट अपघातावर...

अजित पवार विमान अपघातात मोठे अपडेट: VSR व्हेंचर्समध्ये अनेक त्रुटी, लिअरजेट अपघातावर AAIB अहवालात धक्कादायक खुलासे

6
0

अजित पवार विमान अपघातात मोठे अपडेट: VSR व्हेंचर्समध्ये अनेक त्रुटी, लिअरजेट अपघातावर AAIB अहवालात धक्कादायक खुलासे

​AAIB ने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल २०२३ मधील विशाखापट्टनम विमान अपघात आणि बारामती येथील अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेशी संबंधित आहे. नियामकाने (DGCA) फिक्स्ड-विग पायलटंच्या सर्व प्रशिक्षण नोंदींची (Training Records) एकदा तपासणी करावी, असा सल्ला या अहवालात देण्यात आला आहे.
​एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) मुंबई विमानतळावर सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या लिअरजेट विमान अपघाताप्रकरणी अहवाल तयार केला आहे. खराब हवामान असूनही क्रू ने ‘अनस्टेबल अप्रोच’ (अस्थिर लँडिंग प्रक्रिया) सुरू ठेवल्याच्या निर्णयाला AAIB ने या अपघातासाठी जबाबदार धरले आहे. याशिवाय, ‘VSR व्हेंचर्स’ कंपनीच्या पायलट ट्रेनिंग, रेकॉर्ड ठेवणे आणि अंतर्गत ऑडिटमध्येही कमतरता आढळल्या आहेत. याच कंपनीचे लिअरजेट विमान जानेवारीत बारामती येथे कोसळले होते, ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला होता. AAIB ने अशीही शिफारस केली की, DGCA ने सर्व फिक्स्ड-विग पायलटंच्या ट्रेनिंग रेकॉर्ड्सची एकदा तपासणी करावी.