Home Breaking News “मातोश्री रमाई आंबेडकर स्मारकाचे तातडीने भूमिपूजन करा” – स्मारक समितीची उपमुख्यमंत्री अजित...

“मातोश्री रमाई आंबेडकर स्मारकाचे तातडीने भूमिपूजन करा” – स्मारक समितीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जोरदार मागणी; ७ जुलै रोजी विधानभवन घेरावाचा इशारा

151
0
पिंपरी, पुणे | प्रतिनिधी : श्रावणी कामत
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या मागील जागेत मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांचे भव्य आणि यथोचित स्मारक उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या स्मारकासाठी आवश्यक ३५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ जाहीर करून भूमिपूजन करावे, अशी आग्रही मागणी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर व समन्वयक राहुल डंबाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सदर पत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना सोमवारी (३० जून) देण्यात आले. यावेळी महेंद्र सरवदे, बुद्धभूषण अहिरे, प्रशांत नाटेकर, सिद्धार्थ मोरे, विशाल मांजरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मारकाच्या जागेवर दुसरे आरक्षण? – आंबेडकरी जनतेत तीव्र रोष
पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकताच जाहीर केलेल्या प्रस्तावित विकास आराखड्यात रमाई स्मारकाच्या जागेवर दुसऱ्या प्रकारचे आरक्षण दर्शवले गेले आहे. यामुळे आंबेडकरी चळवळीतील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या जागेवर पूर्णाकृती पुतळा, शिल्पसृष्टी आणि उद्यान उभारण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यापूर्वी दिले होते. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतः अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणी देखील केली होती. मात्र, आराखड्यात बदल झाल्यामुळे जनतेत गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
७ जुलै रोजी विधानभवन घेराव आंदोलनाचा इशारा
स्मारक समितीने स्पष्टपणे सांगितले आहे की, या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ७ जुलै २०२५ रोजी, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, विधानभवनाला घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक या आंदोलनात सहभागी होतील, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.
आंबेडकरी समाजाची मागणी काय आहे?
३५ कोटी निधी जाहीर करावा
स्म%A