Home Breaking News पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा!

पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा!

32
0

 पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा!

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे ३ सप्टेंबरला अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी-चिंचवड | २ सप्टेंबर २०२६ :

चिखली जलशुद्धीकरण केंद्रात सुरू असलेल्या नवीन २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (MLD) क्षमतेच्या प्रकल्पासाठी उच्चदाब वीज जोडणीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चिखली केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

इंद्रायणीनगर, सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोवीसावाडी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना याचा फटका बसणार आहे. 

या कामामुळे शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने किंवा अनियमित होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. नागरिकांनी आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.