Home Breaking News गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर निर्बंध!

गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर निर्बंध!

34
0

गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर निर्बंध!

पुणे | १ सप्टेंबर २०२६ :

पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, तसेच नागरिकांचे आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

१४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करता येणार नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

या आदेशाचे उल्लंघन करून मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करताना व्यक्ती, संस्था किंवा गणेश मंडळ आढळल्यास त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ तसेच प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

गणेश मंडळांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.