स्टारलिंक विरुद्ध जिओ: ‘आम्ही भारतात हाय-स्पीड इंटरनेट देण्यास तयार…’, स्टारलिंकचे रिलायन्सला प्रत्युत्तर; अंबानी-मस्क यांच्यात वाढली बयानबाजी
Starlink vs Reliance: एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ कंपनीने भारतात हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी असल्याचा दावा केला आहे. रिलायन्सने स्पर्धेचे स्वागत करून नियमांचे पालन करण्यावर भर दिल्यानंतर स्टारलिंकचे हे वक्तव्य आले आहे.
भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यावरून एलॉन मस्क यांची कंपनी ‘स्टारलिंक’ आणि मुकेश अंबानी यांची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ यांच्यात वाक्-युद्ध तीव्र झाले आहे. स्टारलिंकने शुक्रवारी सांगितले की, ती भारतात हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ती गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ भारतीय नियामक, उद्योग जग आणि टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत काम करत आहे.
स्टारलिंकचे हे विधान रिलायन्सच्या त्या निवेदनानंतर आले आहे, ज्यामध्ये रिलायन्सने सॅटेलाइट इंटरनेट बाजारात स्टारलिंकसह सर्व कंपन्यांचे स्वागत केले होते, मात्र भारतीय कायदे आणि नियमांचे पालन करण्यावर विशेष जोर दिला होता.