Home Breaking News पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव यांची आघाडी...

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव यांची आघाडी कायम!

36
0

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव यांची आघाडी कायम!

 

 

शिक्षक मतदारसंघात गावडे ६,२०० मतांनी पुढे; पदवीधरच्या २६ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयासाठी आणखी १,७५० मतांची गरज
पुणे, दि. २८ ऑक्टोबर २०२६ :
 पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजयाच्या दिशेने निर्णायक आघाडी घेतली असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सचिन सानप हे ६,२०० मतांनी पिछाडीवर आहेत. दत्तात्रय सावंत हे बाद झाले असून, गावडे यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे चित्र आहे. मात्र, अधिकृत निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी आपली आघाडी कायम राखली आहे. २६ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख ११ हजार ३४९ मते, तर भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४७९ मते मिळाली आहेत. त्यामुळे देशमुख-जाधव या ८,८७० मतांनी आघाडीवर आहेत.
पदवीधर मतदारसंघात विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा अद्याप पूर्ण झालेला नाही. हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयासाठी आणखी १,७५० मतांची आवश्यकता असून, पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील मोदी यांच्यासह इतर उमेदवार पिछाडीवर राहिले आहेत.
दरम्यान, शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगांवकर चौथ्या बाद फेरीत बाहेर पडले आहेत. दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, अंतिम अधिकृत निकालाची प्रतीक्षा आहे.