Home Breaking News IND W vs BAN W: आशिया चषकात श्रीचरणीची धडाकेबाज ‘अर्धशतकी’ कामगिरी

IND W vs BAN W: आशिया चषकात श्रीचरणीची धडाकेबाज ‘अर्धशतकी’ कामगिरी

52
0

IND W vs BAN W: आशिया चषकात श्रीचरणीची धडाकेबाज ‘अर्धशतकी’ कामगिरी; कुलदीप यादवचा विक्रम मोडला बांगलादेशविरुद्धच्या आशिया चषकातील सामन्यात भारतीय संघाची फिरकीपटू श्रीचरणीने एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे.

 

यापूर्वी हा विक्रम कुलदीप यादवच्या नावावर होता. भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा सहज पराभव केला.

या विजयासह भारतीय संघाने अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले. भारताने बांगलादेशचा ४० धावांनी पराभव केला. या विजयात श्रीचरणीने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि यादरम्यान एक विक्रमही प्रस्थापित केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ गडी गमावून १४९ धावा केल्या. बांगलादेशचा संघ ७ गडी गमावून केवळ १०९ धावाच करू शकला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात श्रीचरणीने ४ षटकांत १४ धावा देत एक बळी घेतला. या कामगिरीसह तिने ५० बळींचा टप्पाही गाठला.