Home Breaking News भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या ‘राहुल मियाँ’ या विधानावरून निर्माण झालेल्या...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या ‘राहुल मियाँ’ या विधानावरून निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्व भूमीवर, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

40
0

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या ‘राहुल मियाँ’ या विधानावरून निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्व भूमीवर, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

‘मियाँ’ हा शब्द भावाचा उल्लेख करण्यासाठी आणि आदराचे प्रतीक म्हणून वापरला जातो, त्यामुळे त्यात काय चूक आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

९ सप्टेंबर रोजी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे राहुल गांधींवर टीका करताना आणि त्यांना ‘राहुल मियाँ’ असे संबोधताना नितीन नवीन यांनी म्हटले की, राहुल गांधींना ‘वंदे मातरम’चे महत्त्व समजले नाही कारण त्यांचे संगोपन परदेशी संस्कृतीत झाले आहे. काँग्रेसने या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली.

आता संजय राऊत यांनी म्हटले आहे की, जर ‘राहुल मियाँ’चा अर्थ ‘राहुल भाई’ (भाऊ राहुल) असा होत असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संदर्भ देत टोला लगावताना त्यांनी नमूद केले की, परदेशात नरेंद्र मोदी यांनाही ‘नरेंद्र मियाँ’ असे संबोधले जाते.