Home Breaking News पुणे-बंगळुरू महामार्गावर रील बनवणे पडले महागात!

पुणे-बंगळुरू महामार्गावर रील बनवणे पडले महागात!

36
0

पुणे-बंगळुरू महामार्गावर रील बनवणे पडले महागात!

महामार्गावर रील शूट करत वाहतुकीला अडथळा; बावधन पोलिसांची कारवाई, वाहने जप्त

पुणे | १ सप्टेंबर २०२६ :

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर धोकादायक पद्धतीने रील शूट करणे दोघांना चांगलेच महागात पडले. बालेवाडी–भुजबळ चौक, वाकड परिसरात नव्या वाहनांचे चित्रीकरण करताना वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी कारवाई केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ अशोक केदारी आणि ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करणारा अजय संभाजी यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली. रील शूटसाठी वापरण्यात आलेली दोन फॉर्च्युनर वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. 

महामार्गावर वाहनांचा ताफा थांबवून ड्रोनच्या साहाय्याने शूटिंग करण्यात आल्याने मागील बाजूस वाहतुकीची कोंडी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेतली. 

या प्रकरणी BNS कलम 285, 281, 223 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. महामार्गावर रील, स्टंट किंवा फोटोशूटच्या नावाखाली वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.