Home Breaking News उड्डाणानंतर इंजिनमध्ये बिघाड! २२९ प्रवाशांचा थरारक प्रवास सुखरूप संपला; इंडिगो विमानाची आपत्कालीन...

उड्डाणानंतर इंजिनमध्ये बिघाड! २२९ प्रवाशांचा थरारक प्रवास सुखरूप संपला; इंडिगो विमानाची आपत्कालीन परतफेरी.

36
0

उड्डाणानंतर इंजिनमध्ये बिघाड! २२९ प्रवाशां चा थरारक प्रवास सुखरूप संपला; इंडिगो विमानाची आपत्कालीन परतफेरी

गोवा | १ सप्टेंबर २०२६ :

गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 2102 विमानात उड्डाणानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड आढळला. त्यामुळे वैमानिकांनी मानक सुरक्षा प्रक्रियेचे पालन करत विमान मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत आणून सुरक्षित लँडिंग केले.

मंगळवारी सकाळी सुमारे ९.२८ वाजता विमानाने गोव्यातून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर इंजिनमध्ये बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर विमान पुन्हा विमानतळाकडे वळवण्यात आले. विमानातील सर्व २२९ प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इंडिगोने या घटनेला दुजोरा देत सांगितले की, तांत्रिक समस्या लक्षात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि वैमानिकांनी नियमानुसार विमान सुरक्षितपणे परत आणले. विमानाची सध्या देखभाल व तांत्रिक तपासणी सुरू असून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच त्याचे पुढील संचालन केले जाणार आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिगोकडून पर्यायी प्रवासाची व्यवस्था, तसेच अल्पोपहार आणि वेळोवेळी माहिती देण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही विमान कंपनीने स्पष्ट केले.