Home Breaking News महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध...

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार.

55
0

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेचे सुधारित वेळा पत्रक जाहीर; २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार.

पुणे: ५ ऑगस्ट ;भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील Special Intensive Revision (SIR) अर्थात विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांबाबत दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. अंतिम छाननी पूर्ण झाल्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने नागरिकांना मतदार यादीतील माहिती वेळेत तपासून आवश्यक दुरुस्त्या करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या पडताळणी प्रक्रियेला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. या विशेष पुनरावलोकनाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवणे हा आहे.