Home Breaking News संत सोपानकाका पालखी सोहळ्यानिमित्त नीरा-बारामती मार्गावरील वाहतुकीत बदल; 14 ते 16 जुलैदरम्यान...

संत सोपानकाका पालखी सोहळ्यानिमित्त नीरा-बारामती मार्गावरील वाहतुकीत बदल; 14 ते 16 जुलैदरम्यान रस्ते बंद.

31
0

संत सोपानकाका पालखी सोहळ्यानिमित्त नीरा-बारामती मार्गावरील वाहतुकीत बदल; 14 ते 16 जुलैदरम्यान रस्ते बंद.

पुणे, दि. ८ जुलै : संत श्री सोपानकाका महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त बारामती तालुक्यात १४ जुलै ते १६ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

पालखी सोहळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नीरा-बारामती मार्गावरील काही रस्ते जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात संबंधित वाहनांना प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

आदेशानुसार १४ जुलै ते १६ जुलै २०२६ या कालावधीत पालखीच्या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून, पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी व वाहनचालकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.