Home Breaking News नाशिक पोलीस दलात खळबळ; एएसआय व पोलीस कॉन्स्टेबल 10 हजारांची लाच घेताना...

नाशिक पोलीस दलात खळबळ; एएसआय व पोलीस कॉन्स्टेबल 10 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.

37
0
नाशिक पोलीस दलात खळबळ; एएसआय व पोलीस कॉन्स्टेबल 10 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.

नाशिक, दि. 19 : नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या नातेवाईकाने घरगुती वादातून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत संबंधित अधिकाऱ्यांनी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले.

या प्रकरणानंतर मिलिंद शेजवळ आणि गणेश कुमावत यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून, या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.