Home Breaking News अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे दगडूशेठ गणपती चरणी दर्शन; ‘बदलाचा संकल्प’ घेऊन...

अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे दगडूशेठ गणपती चरणी दर्शन; ‘बदलाचा संकल्प’ घेऊन विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात

39
0
पुणे : प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी सज्ज झालेल्या अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे भावपूर्ण दर्शन घेतले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आपल्या कार्यासाठी आशीर्वाद मागितले. दर्शनानंतर त्यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत परिवर्तनाचा ठाम संदेश दिला.
“आता थांबायची वेळ संपली आहे. आता बदल घडवण्याची वेळ आली आहे,” असे ठाम शब्दांत सांगत त्यांनी प्रभागातील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीवर आधारित विकास घडवण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिलांची सुरक्षितता आणि युवकांच्या संधी – या सर्व प्रश्नांवर ठोस आणि परिणामकारक उपाययोजना राबवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. “विकास हा फक्त भाषणांत नाही, तर तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवा. सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवणारा विकासच माझे ध्येय आहे,” असे त्या म्हणाल्या.
दगडूशेठ गणपतीच्या चरणी घेतलेला हा संकल्प केवळ वैयक्तिक नसून, संपूर्ण प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे, असे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या विश्वासावर आणि सहभागावरच हा बदल शक्य असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येकाला या परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले.
बाप्पाच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठबळावर प्रभागात नवे नेतृत्व, नवा विचार आणि नवा विकासाचा अध्याय सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दर्शनाने त्यांच्या प्रचाराला अधिक ऊर्जा आणि सकारात्मक दिशा मिळाल्याचे कार्यकर्त्यांमध्येही दिसून आले.