Home Breaking News रांजणगाव एमआयडीसीत एलजी कंपनीच्या मालवाहू वाहनातून ₹2.08 लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल चोरी.

रांजणगाव एमआयडीसीत एलजी कंपनीच्या मालवाहू वाहनातून ₹2.08 लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल चोरी.

33
0

रांजणगाव एमआयडीसीत एलजी कंपनीच्या मालवाहू वाहनातून ₹2.08 लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल चोरी.

रांजणगाव, दि. 17 जुलै : रांजणगाव एमआयडीसी परिसरात उभ्या असलेल्या एलजी कंपनीच्या मालवाहू वाहनाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ₹2,08,427 किमतीचा इलेक्ट्रॉनिक माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै ते 13 जुलै 2026 या कालावधीत रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीच्या वेअरहाऊसमधून नागपूरकडे माल घेऊन जाणाऱ्या NL-01-AA-0397 क्रमांकाच्या मालवाहू वाहनाचे सील (लॉक) अज्ञात चोरट्यांनी तोडले. त्यानंतर वाहनातील 13 एलईडी टीव्ही आणि 2 मॉनिटर्स असा एकूण ₹2,08,427 किमतीचा माल चोरी करून नेण्यात आला.

या घटनेप्रकरणी वाहतूक व्यवसायिक शरद तुकाराम पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 332/2026 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज, वाहनाचा मार्ग आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत करण्यासाठी पोलीस विविध दिशांनी तपास करत आहेत