भारत-रशिया मैत्रीचा मजबूत संदेश! शिखर परिषदपूर्वी क्रेमलिनमध्ये जयशंकर–पुतिन यांची विशेष चर्चा
मॉस्को | भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला काहीच दिवस शिल्लक असताना, भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी क्रेमलिनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.
या भेटीने दोन्ही देशांमधील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे.
धोरणात्मक सहकार्यावरील विस्तृत चर्चा
या उच्चस्तरीय भेटीत —
-
ऊर्जा सहकार्य
-
संरक्षण सहयोग
-
व्यापार आणि गुंतवणूक
-
जागतिक भू-राजकीय घडामोडी
-
उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर
-
शिक्षण व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे प्रकल्प
या सर्व विषयांवर सखोल चर्चा झाली असल्याची माहिती राजनैतिक सूत्रांनी दिली.
भारत–रशिया संबंधांना नवा वेग
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जयशंकर यांच्या भेटीचे स्वागत करतानाच म्हटलं —
“भारत आमचा दीर्घकालीन आणि विश्वासू भागीदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वार्षिक शिखर परिषदेत मजबूत प्रगतीची अपेक्षा आहे.”
तर जयशंकर यांनी प्रत्युत्तरात सांगितले कि —
“भारत-रशिया संबंध हे जागतिक परिवर्तनांच्या काळातही स्थिर, दृढ आणि परस्परपूरक राहिले आहेत.”
ऊर्जा, संरक्षण आणि व्यापार — तिन्ही क्षेत्रात मोठे निर्णय शक्य
या भेटीनंतर आगामी शिखर परिषदेत
-
अणुऊर्जा प्रकल्प
-
दीर्घकालीन तेल व वायू आयात करार
-
नवीन संरक्षण तंत्रज्ञान सह-विकास
-
द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य