Home Breaking News सबरीमला मंदिरातून साडेचार किलो सोनं गायब : केरळ उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

सबरीमला मंदिरातून साडेचार किलो सोनं गायब : केरळ उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

93
0
तिरुअनंतपुरम | प्रतिनिधी :- देशभरातील श्रद्धेचं प्रमुख केंद्र असलेल्या सबरीमला मंदिरात मोठा घोटाळा समोर आला आहे. मंदिरातील साडेचार किलो सोनं रहस्यमयरीत्या गायब झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण केरळमध्ये खळबळ माजली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत केरळ उच्च न्यायालयाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मंदिरातील संपत्ती ही लाखो भाविकांच्या श्रद्धेची आणि विश्वासाची निशाणी मानली जाते. सोनं गायब झाल्याने भक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. अनेक भक्तांनी मंदिर प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप केले असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अंदाजे साडेचार किलो सोन्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असून, हे सोनं मंदिरातील देवस्थानाच्या कामकाजासाठी व धार्मिक अलंकारांसाठी वापरले जात होते. सोनं गायब झाल्याने मंदिर प्रशासनातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना स्पष्ट निर्देश दिले की, “मंदिर प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्यावर सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा दिली जावी.” न्यायालयाने तपास अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे केरळ सरकारवरही दबाव वाढला आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून, मंदिर सुरक्षेतील उणिवांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.