Home Breaking News महाराष्ट्र FDA ची रिलायंस कंझ्युमर प्रोडक्ट्सचे संचालक, रिलायंस रिटेल, ब्लिंकईट आणि झोमॅटो...

महाराष्ट्र FDA ची रिलायंस कंझ्युमर प्रोडक्ट्सचे संचालक, रिलायंस रिटेल, ब्लिंकईट आणि झोमॅटो हायपरप्योर यांच्यावर FIR दाखल

10
0

महाराष्ट्र FDA ची रिलायंस कंझ्युमर प्रोडक्ट्सचे संचालक, रिलायंस रिटेल, ब्लिंकईट आणि झोमॅटो हायपरप्योर यांच्यावर FIR दाखल

महाराष्ट्र FDA ने एक्सपायरी फूड प्रोडक्ट्सविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. रिलायंस कंझ्युमर प्रोडक्ट्सचे संचालक आणि इतर ९ जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे. ठाणे आणि पुणे येथे टाकलेल्या छाप्यांनंतर ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) एक्सपायर झालेले, खराब आणि रिजेक्ट केलेले अन्नपदार्थ यांची हेराफेरी आणि विक्री विरोधात अनेक जिल्ह्यांत छापे टाकले. यादरम्यान ४८ लाख रुपये मूल्याचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी रिलायंस कंझ्युमर प्रोडक्ट्सच्या एका संचालकासह १० जणांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. ठाण्याच्या शांतीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रिलायंस कंझ्युमर प्रोडक्ट्स, रिलायंस रिटेल, ब्लिंकईट आणि झोमॅटो हायपरप्योरशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तसेच विल्हेवाट लावणारी एजन्सी (डिसपोजल एजन्सी) चालवणारे आणि स्थानिक पुरवठादारांचा समावेश आहे.

ही FIR ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ (Food Safety and Standards Act, 2006) आणि ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ च्या संबंधित कलमांखाली नोंदवण्यात आली आहे.