Home Breaking News पुणे:बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे १९ जण पोलिस दलात; दोघांना अटक, पुणे पोलिसांत...

पुणे:बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे १९ जण पोलिस दलात; दोघांना अटक, पुणे पोलिसांत खळबळ.

22
0

पुणे:बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे १९ जण पोलिस दलात; दोघांना अटक, पुणे पोलिसांत खळबळ

पुणे | ५ सप्टेंबर २०२६ :

पुणे शहर पोलिस दलातील भरती प्रक्रियेत बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेळाडूंसाठी असलेल्या ५ टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत १९ उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पोलिस दलात नोकरी मिळवल्याची माहिती समोर आली आहे.
‘कुराश’ या पारंपरिक कुस्ती प्रकारातील तसेच ‘ड्रॅगनबोट’ या सामूहिक नौकानयन खेळातील बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. बनावट प्रमाणपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करून सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रकारामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रमाणपत्रांच्या आधारे संबंधित उमेदवारांनी क्रीडा आरक्षणाचा लाभ घेतला. आता या १९ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तसेच भरती प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, बनावट प्रमाणपत्रे नेमकी कुठे आणि कशी तयार करण्यात आली, तसेच या माध्यमातून किती जणांनी सरकारी नोकरी मिळवली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणातील पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.