Home Breaking News हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास होणार अधिक सुकर! NCMC, WhatsApp QR आणि UPI तिकीटाची...

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास होणार अधिक सुकर! NCMC, WhatsApp QR आणि UPI तिकीटाची सुविधा

32
0

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास होणार अधिक सुकर! NCMC, WhatsApp QR आणि UPI तिकीटाची सुविधा.

पुणे:३१ ऑगस्ट 2026.

पुणेकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे मेट्रो लाईन 3 वर प्रवाशांना आधुनिक तिकीट व्यवस्था उपलब्ध होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुरू होणाऱ्या या मार्गावर NCMC कार्ड, WhatsApp QR तिकीट, मोबाईल ॲप, TVM आणि तिकीट काऊंटर अशा विविध पर्यायांतून तिकीट काढता येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील स्थानकांवर Automatic Fare Collection (AFC) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून प्रत्येक स्थानकावर किमान पाच AFC गेट्स बसवण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची प्रवेश-निर्गमन प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे.

केंद्राच्या ‘वन नेशन, वन कार्ड’ उपक्रमांतर्गत NCMC कार्डचा वापर लाईन 3 सोबत पुणे मेट्रोच्या इतर मार्गांवर तसेच देशातील इतर मेट्रो नेटवर्कमध्ये करता येणार आहे.

प्रवाशांना WhatsApp वरून QR तिकीट तसेच मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुक करण्याची सुविधाही मिळणार आहे. TVM मशीनवर रोख रक्कम, UPI, डेबिट कार्ड आणि डिजिटल पेमेंटचा वापर करता येईल.

लाईन 3 सुरू झाल्यानंतर हिंजवडी–शिवाजीनगर प्रवास अधिक जलद, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.