Home Breaking News पुण्यातील रस्ते प्रकल्पांना गती; खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला खुला होणार”.

पुण्यातील रस्ते प्रकल्पांना गती; खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला खुला होणार”.

37
0

पुण्यातील रस्ते प्रकल्पांना गती; खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला खुला होणार”.

खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्याचे आयुक्तांचे आदेश; रस्ता रुंदीकरण व ड्रेनेजची कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

पुणे, दि. १० ऑगस्ट २०२६ : पुणे शहरातील महत्त्वाच्या रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांची आज महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी केली. यावेळी संबंधित कामांना गती देत नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नॉर्थ मेन रोडवरील ABC फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करताना रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या सेवावाहिन्या तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया त्वरित सुरू करून रस्ता रुंदीकरणाचे काम शीघ्रतेने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

त्यानंतर हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी सुरू असलेले पावसाळी लाईन आणि ड्रेनेज लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने प्रकल्पातील अडथळे दूर करून काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि तज्ज्ञ सल्लागारांना देण्यात आल्या.

दरम्यान, खराडी-केशवनगर पुलाच्या कामाची पाहणी करताना हा पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी १५ ऑगस्ट २०२६ रोजी खुला करण्याचे निर्देश आयुक्त नवल किशोर राम यांनी मुख्य अभियंता (पथ) यांना दिले. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही अॅप्रोच रोडची कामे सुरू राहणार असल्याने नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

या पाहणीवेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, प्रभारी मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.