Home Breaking News भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी; श्रावणात मंदिर दर्शनासाठी दिवसभर खुले.

भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी; श्रावणात मंदिर दर्शनासाठी दिवसभर खुले.

47
0

भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी; श्रावणात मंदिर दर्शनासाठी दिवसभर खुले.

पुणे : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून सकाळी ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या श्रावणी सोमवार यात्रा नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्रावण महिन्यात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दीचे नियोजन, भाविकांची सुरक्षितता आणि दर्शन व्यवस्था यावर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

यापूर्वी भीमाशंकर परिसरातील विकासकामांमुळे सभा मंडप आणि पायरी मार्गाचे काम सुरू असल्याने दर्शनाची वेळ सकाळी ७ ते ११ या चार तासांपुरती मर्यादित करण्यात आली होती. मात्र, सध्या ही कामे तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याने दर्शन व्यवस्था सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दर्शनाची वेळ वाढवल्यामुळे श्रावणी सोमवार तसेच संपूर्ण श्रावण महिन्यात दूरवरून येणाऱ्या भाविकांना अधिक वेळ आणि शांततेत ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून आवश्यक नियोजन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.