लोणावळा पोलिसांकडून २४ तासांत चोरीचा उलगडा; २,२१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

लोणावळा :०६ ऑगस्ट २०२६ ; लोणावळा शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत२५ जुलै २०२६ रोजी दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण , सीसीटीव्ही फुटेज, Google Pay व्यवहार, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला.
आरोपी हरिदास बालू कोळेकर मानपाडा, कल्याण (मुंबई) येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यास ताब्यात घेण्यात आले.भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गात गुन्हा रजिस्टर करण्यात आला. घटनेची नोंद तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹२,२१,०००)
एच.पी. (HP) कंपनीचा लॅपटॉप,२ ओप्पो (Oppo) मोबाईल फोन,ॲपल (Apple) स्मार्ट वॉच ,ॲपल (Apple) एअरपॉड् , रोख रक्क गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन दुचाकी (क्र. MH-03-FG-3349)
मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक (पो.उ.नि. देवरे, पो.हवा. संदीप मानकर, पो.शि. नागेश कमठणकर आणि होमगार्ड अक्षय कोकाटे) यांनी ही कारवाई यशस्वी केली.
