Home Breaking News मुंबई:विकसित महाराष्ट्र’अंतर्गत एसटीचा 100% ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!

मुंबई:विकसित महाराष्ट्र’अंतर्गत एसटीचा 100% ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!

31
0

मुंबई:विकसित महाराष्ट्र’अंतर्गत एसटीचा 100% ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!

मुंबई:१ जून २०२६,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेस संदर्भात बैठक पार पडली.

‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ एसटी महामंडळामध्ये सन 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80% तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पर्यावरणपूरक ई-बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत, त्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढील 7 दिवसात निरीक्षण करावे. या बसेसकरिता एक इकोसिस्टिम तयार करावी, तसेच ज्या मार्गाने खासगी बसेस धावतात, त्या मार्गाचाही अभ्यास करून ई-बसेसचा पर्याय तयार ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

राज्य शासनाच्या विद्यमान ई-वाहन धोरणांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई-बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल ₹20 लाख इतके अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हे धोरण महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या जीसीसी मॉडेलवर 5150 ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.