Home Breaking News २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; १० जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीची सुविधा, २५ जानेवारीपासून...

२०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; १० जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीची सुविधा, २५ जानेवारीपासून घरोघरी सर्वेक्षण

15
0

 २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; १० जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीची सुविधा, २५ जानेवारीपासून घरोघरी सर्वेक्षण.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर केले असून, देशभरात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष जनगणना केली जाणार आहे. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन माहिती नोंदवण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेंतर्गत १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन पोर्टलवर स्वतःची तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती भरता येणार आहे. त्यानंतर २५ जानेवारीपासून जनगणना कर्मचारी घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील. या जनगणनेसाठी १ मार्च २०२७ ही संदर्भ तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच १ ते ५ मार्चदरम्यान संकलित माहितीचे पुनरीक्षण करून राहिलेल्या नोंदींची तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सध्याच्या वेळापत्रकातून वगळण्यात आले आहे. यामध्ये मणिपूर (पुढील घोषणा होईपर्यंत), गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि लडाख यांचा समावेश आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील बर्फाच्छादित भागांमध्येही या वेळापत्रकानुसार जनगणना होणार नाही. या राज्यांसाठी आणि प्रदेशांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
जनगणनेचे महत्त्वाचे टप्पे :
* १० ते २४ जानेवारी २०२७ : ऑनलाइन स्वयं-नोंदणी.
* २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ : घरोघरी प्रत्यक्ष जनगणना.
* १ मार्च २०२७ : जनगणनेची संदर्भ तारीख.
* १ ते ५ मार्च २०२७ : माहितीचे पुनरीक्षण.