Home Breaking News बंगालच्या उपसागरातील ‘मुरासू’ चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा!

बंगालच्या उपसागरातील ‘मुरासू’ चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा!

27
0

 बंगालच्या उपसागरातील ‘मुरासू’ चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा!

विदर्भातील सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुण्यासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मुरासू’ चक्रीवादळ तीव्र झाले असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ ३ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

३ आणि ४ नोव्हेंबर रोजी विदर्भातील काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ३ नोव्हेंबरला नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात ३ नोव्हेंबरला मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टीच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.