Home Breaking News ९ तासांच्या धरण्यानंतर ताब्यात घेतलेल्या राहुल गांधींची सुटका

९ तासांच्या धरण्यानंतर ताब्यात घेतलेल्या राहुल गांधींची सुटका

9
0

९ तासांच्या धरण्यानंतर ताब्यात घेतलेल्या राहुल गांधींची सुटका, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांचे निदर्शने
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी

यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सुटका केली आहे.
घटनास्थळी उपस्थित बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांना किंग्जवे कॅम्प येथे नेण्यात आले होते, जिथे मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता त्यांची सुटका करण्यात आली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीतील आकाशवाणी भवनात राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी काँग्रेसच्या इतर नेत्यांसह उपोषणाला/धरणे आंदोलनाला बसले होते.