Home Breaking News बंदुकीच्या तोंडावर किंवा धाकावर दहशतवाद्यांसारखे रोखले विरोधी खासदारांचा दिल्ली आंदोलन : संजय...

बंदुकीच्या तोंडावर किंवा धाकावर दहशतवाद्यांसारखे रोखले विरोधी खासदारांचा दिल्ली आंदोलन : संजय राऊत

7
0

बंदुकीच्या तोंडावर किंवा धाकावर दहशतवाद्यांसारखे रोखले विरोधी खासदारांचा दिल्ली मार्च : संजय राऊत

SIR आणि निवडणूक आयोगाविरोधात विरोध-प्रदर्शन अधिक तीव्र झाले आहे. पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि INDIA आघाडीच्या इतर नेत्यांना ताब्यात घेतले. काँग्रेसने ८ ऑक्टोबर रोजी देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीत विरोधी पक्षांचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला की, खासदारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्यापासून बंदुकीच्या धाकावर रोखण्यात आले. जणू ते दहशतवादी असल्यासारखे रोखले गेले आणि महिला खासदारांशी दुर्व्यवहार करण्यात आला.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘चोरांच्या’ हाती सोपवल्याचा आरोप केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) बाबतीतही त्यांनी असेच केल्याचा दावा केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या खासदारांनी मत चोरीच्या (वोट चोरी) आरोपांवरून मोर्चाचे आयोजन केले

होते.