कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ.

पिंपरी : दि: २१ ऑक्टोबर २०२६:- दसरा आणि विजयादशमीच्या निमित्ताने संत तुकाराम नगर व वल्लभनगर परिसरात सीमोल्लंघन,पथ संंचलन आणि सोनं लुटण्याचा पारंपरिक सांस्कृतिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा प्रारंभ माजी खासदारअमर साबळे यांच्या हस्ते (दि.२०)करण्यात आला. या सोहळ्याच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी शेकडो बंधू भगिनींनी या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
विजयादशमी तथा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दुपारी ३ वाजता सीमाउल्लंघन कार्यक्रम तसेच पथ संंचलन राष्ट्रीय श्रमिक आघाडी तसेच संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था मर्यादितच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.पथसंचालनाचे उद्घाटन मा.खासदार श्री अमरजी साबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन संघटनेचे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी केले होते.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅलीला सुरुवात झाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुतळा येथे महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला तसेच स्वामींचे मंदिरात स्वामींना पुष्पहार अर्पण करून, बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.गंगानगर ते अक्षय सोसायटी YCMH या रस्त्यांच्या सीमाउल्लंघन करण्यापूर्वी माजी नगरसेवक श्री बबनराव गाढवे, भाजपा नेते किरणजी सुवर्णा, भाजप मंडलाध्यक्ष मंगेश धाडगे, भाजप नेते नंदू आप्पा कदम, महेंद्र बाविस्कर, दिनेश भाऊ पाटील, शेखर भाऊ पाटील, संदीप नाईक इत्यादी कार्यकर्त्यांनी मा.खासदार अमरजी साबळे व श्री यशवंतभाऊ भोसले यांना श्रीफळ देऊन स्वागत केले.
त्यानंतर वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर यांच्या सीमारेषेवरील गणेश मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. दोन्ही परिसरांतील नागरिकांनी एकत्र येत श्री गणेश मंदिरात भक्तिभावाने सोनं लुटण्याच्या परंपरेत सहभाग घेतला. आपट्याची पाने एकमेकांना देत शुभेच्छा व्यक्त करण्याच्या या परंपरेतून परस्परांतील स्नेह, प्रेम आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.विशेष म्हणजे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची ६ वर्षाची नात लिनेशा हिने प्रथमच सोने लुटणे व पथसंंचलन मध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना माजी खासदार अमर साबळे म्हणाले की, विजयादशमीच्या निमित्ताने दुःखातून सुखाकडे आणि पराभवातून यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा सीमोल्लंघनाच्या परंपरेतून मिळते. यशवंतभाऊ भोसले यांनी वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर परिसरात ही परंपरा सुरू करून सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात या परिसराचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या उपक्रमाची निश्चितच आठवण राहील. यशवंतभाऊ भोसले यांनी यापूर्वी परिसरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडीची परंपराही सुरू केली आहे. या दिंडीत परिसरातील नागरिक, वारकरी आणि भक्तिभावाने सहभागी होणारे भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.सीमोल्लंघन आणि आषाढी दिंडी या दोन्ही उपक्रमांमधून स्थानिक संस्कृतीचे जतन करण्यासोबतच नागरिकांमध्ये एकोपा वाढविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आपल्या मनोगतात सीमोल्लंघनाच्या परंपरेमागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट केले. पूर्वी ग्रामीण भागात दोन गावांतील नागरिक सीमारेषेवर एकत्र येऊन गळाभेट घेत, एकमेकांना शुभेच्छा देत आणि मंदिरात जाऊन सोनं लुटण्याची परंपरा पाळत असत. याच परंपरेचे पुनरुज्जीवन संत तुकाराम नगरमध्ये करण्याचा प्रयत्न आहे.
चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री जयदेव अक्कलकोटे, अनिकेत भोसले,दीपक शेठ पाटील, दत्ताजी गायकवाड, आदित्य देशपांडे,राहुलजी शितोळे,अंकुशजी वाघमारे, अप्पू जी नायर,ओमकारजी जोकारे, मानसी ताई देशपांडे, लताताई पाटील, चंद्रकांत भालेराव,शालन ताई महापुरे,योगेंद्रजी आरवडे,कैलासजी गव्हाणे,शिरीषजी सासवडे, सतीशजी सासवडे, श्रेयस करे, विनायक जी निकम,जेवियर अँथोनी किसन भाग्यवंत, मल्लेषजी कोरवी, इस्मत सय्यद,दगडू जी लेंडे, रावसाहेब पाबळे, सुदामजी गायकवाड,आप्पासाहेब माने, नंदकिशोर जोशी, महेश जी भुते,आरतीताई पराळे, उषाताई टाकळकर, सुधाकरजी शिंदे,अंकुशजी गायकवाड, फौजदार गायकवाड,भाऊसाहेब गायकवाड, राजाराम भोंडवे, संतोषी चौधरी, सना शेख, दत्तात्रय झरकर, अमोल घोरपडे, प्रियाताई घोरपडे, राजनीताई मगर इत्यादी प्रमुख मान्यवरांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.