Home Breaking News पुण्यात MBBSच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; कात्रज परिसरातील धक्कादायक घटना.

पुण्यात MBBSच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; कात्रज परिसरातील धक्कादायक घटना.

70
0

पुण्यात MBBSच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; कात्रज परिसरातील धक्कादायक घटना.

पुणे | ९ सप्टेंबर.
पुण्यात MBBSचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली उडी मारून आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरात घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव माया रेड्डी असून ती मूळची हैदराबाद येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

माया पुण्यातील भारती विद्यापीठात MBBSच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. प्राथमिक माहितीनुसार, परीक्षा आणि अभ्यासाच्या वाढलेल्या तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

घटनेची माहिती मिळताच कात्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, विद्यार्थिनीवर कोणत्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली, याचा तपास केला जात आहे.