Home Breaking News चेंबूरच्या प्रसिद्ध ‘अशफाक बेकरी’वर FDAचा दणका; 156 पैकी फक्त 56 गुण, परवाना...

चेंबूरच्या प्रसिद्ध ‘अशफाक बेकरी’वर FDAचा दणका; 156 पैकी फक्त 56 गुण, परवाना निलंबनाचा प्रस्ताव.

27
0

चेंबूरच्या प्रसिद्ध ‘अशफाक बेकरी’वर FDAचा दणका; 156 पैकी फक्त 56 गुण, परवाना निलंबनाचा प्रस्ताव.

मुंबई | 2 सप्टेंबर 2026 :

मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेते आणि बेकरी चालकांच्या स्वच्छतेविषयी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. चेंबूर येथील सम्राट अशोक नगर, आर.सी. मार्ग परिसरातील प्रसिद्ध ‘अशफाक बेकरी’ची अचानक तपासणी करण्यात आली.

FDAच्या तपासणी अहवालानुसार बेकरीला 156 पैकी केवळ 56 गुण, म्हणजेच सुमारे 36 टक्के गुण मिळाले. तपासणीत बेकरीचे कामकाज ‘नॉन-कमप्लायन्स’ असल्याचे नमूद करण्यात आले.

तपासणीदरम्यान अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव, अस्वच्छ वातावरणात पॅकिंग तसेच तापमान नियंत्रणातील त्रुटी आढळल्याचे अहवालात नमूद आहे.

याशिवाय जुन्या-नवीन मालाच्या वापरासाठी FIFO/FEFO पद्धतीचा अपुरा वापर आणि Cross-Contamination रोखण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचेही समोर आले.

बेकरी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत तसेच आवश्यक संरक्षणात्मक पोशाख, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे आणि अन्न सुरक्षा प्रशिक्षणाच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे तपासणीत आढळले.

या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका लक्षात घेऊन अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. नियमांनुसार आवश्यक सुधारणा पूर्ण करेपर्यंत बेकरी प्रशासनाच्या रडारवर राहणार आहे.

FDAच्या या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.