Home Breaking News मोहम्मद सिराजला मिळाले कर्णधारपद, आता दिसणार खरा ‘मियाँ मॅजिक’

मोहम्मद सिराजला मिळाले कर्णधारपद, आता दिसणार खरा ‘मियाँ मॅजिक’

44
0

मोहम्मद सिराजला मिळाले कर्णधारपद, आता दिसणार खरा ‘मियाँ मॅजिक’

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची रणजी करंडक स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर मोठी जबाबदारी आली आहे. आता तो केवळ संघाचा वरिष्ठ खेळाडू राहिला नसून कर्णधार बनला आहे. निवड समितीने सिराजच्या ‘मॅजिक’वर विश्वास दाखवला आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त करत त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. सिराज रणजी करंडक स्पर्धेत हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. तर, सीव्ही मिलिंदची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सिराज सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. सिराजच्या अनुपस्थितीत मिलिंद संघाची धुरा सांभाळेल. संघात तन्मय अग्रवाल, राहुल सिंग यांसारख्या अनुभवी खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सिराज भारतीय संघाचा भाग आहे. ही मालिका ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हैदराबादचा पहिला रणजी करंडक सामना ११ ऑक्टोबरला त्रिपुरा विरुद्ध आहे, ज्याचे ठिकाण (व्हेन्यू) अद्याप निश्चित झालेले नाही.