कॉकरोच, मांजर, माश्या आणि पाल… महाराष्ट्र FDA कडून ३० फूड लायसन्स निलंबित, १.१९ कोटी रुपयांचा साठा जप्त
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सणासुदीच्या काळात राज्यभरात केलेल्या धडक कारवाईत ३० फूड लायसन्स (अन्न परवाने) निलंबित केले असून १.१९ कोटी रुपये मूल्याचा ५०,६०१.७८ किलोग्रॅम अन्नाचा साठा जप्त केला आहे.
महाराष्ट्र एफडीएने सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राबवलेल्या मोहिमेअंतर्गत २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान ३० अन्न परवाने निलंबित केले आणि १.१९ कोटी रुपयांचे ५०,६०१.७८ किलोग्रॅम खाद्यपदार्थ जप्त केले. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील १३, कोकण विभागातील ६, पुणे विभागातील ८ आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील ३ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत.
प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कायनी अँड कंपनी (Kyani & Co.), कुलाबा स्विट मार्ट, अरुण विलास फरसाण, रुची व्हेज रेस्टॉरंट, डॅफोडिल्स फास्ट फूड इन आणि सबवे (Subway) यांसारख्या अनेक नामांकित आस्थापनांवर अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

