Home Breaking News वाहतूक कोडींपासून सुटका,पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू.

वाहतूक कोडींपासून सुटका,पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू.

72
0

वाहतूक कोडींपासून सुटका,पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू,

Pune: पुणे शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या असून राज्यकर्ते या वाहतूक कोंडीपासून सुटकेसाठी प्रयत्नशील आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिक प्रयत्नशील होते.

मात्र, त्यांचे दुर्दैवी निधन झाले. आता, त्यांनीच मांडलेल्या संकल्पनेतून पुण्यात डबल डेकर पुल साकारला आहे.अजित पवार यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला होता. देवेंद्र फडणवीस यांनीही या विकास कामासाठी साथ दिली. अजित पवार यांनी जो विचार केला होता, त्यांची दूरदृष्टी होती की याची निर्मिती करताना एकत्रित हा पूल व्हावा, त्यानुसार हा प्रकल्प आज पूर्ण होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले.आता, पुण्याच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.

या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.