महाराष्ट्रात ५५३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करत ५५३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद केली असून, या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले. राज्यभर टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत.