Home Breaking News टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने थार चोरी; CCTV च्या मदतीने अट्टल आरोपी सोलापुरातून जेरबंद.

टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने थार चोरी; CCTV च्या मदतीने अट्टल आरोपी सोलापुरातून जेरबंद.

63
0

टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने थार चोरी; CCTV च्या मदतीने अट्टल आरोपी सोलापुरातून जेरबंद.

सातारा: २६ जुलै ; सातारा शहरातील महिंद्रा शोरूममधून टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने महिंद्रा थार घेऊन फरार झालेल्या सराईत आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोलापुरातून अटक केली आहे. सोहेल अफजल बागवान (रा. पंढरपूर, सध्या सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

५ जुलै रोजी आरोपीने टेस्ट ड्राइव्हसाठी थार गाडी घेतल्यानंतर ती परत न करता पलायन केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तब्बल ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना आरोपीला घेण्यासाठी आलेल्या कारचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. त्यावरून तपासाची दिशा मिळाली आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले.

तपासादरम्यान आरोपीकडून सातारा आणि चाकण येथून चोरलेल्या दोन महिंद्रा थार गाड्या जप्त करण्यात आल्या. आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.