Home Breaking News जन नायकन’चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडाका; परदेशी बाजारातही विक्रमी कमाई

जन नायकन’चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडाका; परदेशी बाजारातही विक्रमी कमाई

11
0

जन नायकन’चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडाका; परदेशी बाजारातही विक्रमी कमाई
तमिळ चित्रपट **’जन नायकन’**ने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. अभिनेता ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले विजय यांच्या अखेरच्या चित्रपटावर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

सात महिन्यांच्या विलंबानंतर विजय यांचा राजकीय थ्रिलर ‘जन नायकन’ 23 जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता होती आणि अॅडव्हान्स बुकिंगलाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाने विक्रमी कमाई केली.
एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या **’जन नायकन’**ने पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 41 कोटी रुपयांची कमाई केली. तर जागतिक स्तरावरील कमाई ही देशांतर्गत कमाईपेक्षा जवळपास दुप्पट असल्याचे सांगितले जात आहे.
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद तमिळ भाषेत मिळाला.
भाषेनुसार पहिल्या दिवसाची कमाई :
तमिळ – 36.50 कोटी रुपये
तेलुगू – 2.75 कोटी रुपये
हिंदी – 1.75 कोटी रुपये