Home Breaking News अन्ना हजारे यांची प्रकृती ठीक नसतानाही अहिल्यानगरात दोन तासांचे ‘मौन आंदोलन’; ज्येष्ठ...

अन्ना हजारे यांची प्रकृती ठीक नसतानाही अहिल्यानगरात दोन तासांचे ‘मौन आंदोलन’; ज्येष्ठ समाजसेवकांना अश्रू अनावर

10
0

अन्ना हजारे यांची प्रकृती ठीक नसतानाही अहिल्यानगरात दोन तासांचे ‘मौन आंदोलन’; ज्येष्ठ समाजसेवकांना अश्रू अनावर

Anna Hazare Silent Protest News: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी अहिल्यानगर येथे दोन तासांचे ‘मौन आंदोलन’ केले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. काही वेळ ते आंदोलनस्थळी थांबले आणि त्यानंतर ते निघून गेले.

मौन आंदोलनादरम्यान अण्णा हजारे यांना अश्रू अनावर झाले. गुरुवारी सकाळी ११ वाजता अहिल्यानगरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ त्यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आणि दुपारी १ वाजता ते आंदोलन समाप्त केले.