Home Breaking News Nagpur:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर  चा 2रा दीक्षांत समारंभास महामहिम राष्ट्रपती श्रीमती...

Nagpur:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर  चा 2रा दीक्षांत समारंभास महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.

48
0

Nagpur:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर  चा 2रा दीक्षांत समारंभास महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.

आरोग्य, शिक्षण आणि प्रगतीचा नवा टप्पा

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स नागपूर) चा 2रा दीक्षांत समारंभ’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर येथील एम्सच्या द्वितीय दीक्षांत समारंभातील विद्यार्थी अत्यंत भाग्यवान आहेत, कारण त्यांना महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते पदवी प्राप्त झाली आहे. मध्य भारतातील रुग्ण मोठ्या आशेने या एम्सकडे पाहत असून, उपचारासाठी येथे येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या व्यापक उद्देशाने एम्सचा विस्तार केला, त्या उद्दिष्टपूर्तीकडे नागपूर एम्स यशस्वीपणे वाटचाल करत असल्याचे दिसून येते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात वैद्यकीय शिक्षणाचा झालेला विस्तार हा एक विक्रम आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्रातही मागील काही वर्षांत 15 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. यामुळे गरजू व्यक्तींपर्यंत वैद्यकीय सेवेचा लाभ पोहोचविणे शक्य होत आहे. राज्यात प्रत्येक नागरिकाला 5 किमीच्या परिघात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, असे सक्षम आणि व्यापक जाळे उभारण्याचे काम आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आज नागपूर एम्स येथील विद्यार्थी ‘हिलर्स’ म्हणजेच उपचार करणारे म्हणून येथून बाहेर पडत आहेत. आजच्या जगाला अशाच संवेदनशील आणि जबाबदार चिकित्सकांची गरज आहे. तसेच मोठ्या संख्येने मुली वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडवत आहेत, हे नव्या भारताचे प्रतीक आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, नागपूर एम्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.(प्रा) प्रशांत जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.