पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख अधिक भक्कम करत बेल्जियमच्या City of Leuven च्या India House संचालक गीर्ट रोब्बेरॅक्ट्स यांचे दोन दिवसांचे विशेष स्वागत केले. ३ आणि ४ डिसेंबर दरम्यान झालेल्या या भेटीत PCMC आणि ल्युवेन शहरामधील शाश्वतता, नवकल्पना, मोबिलिटी आणि औद्योगिक प्रगती याबाबत सखोल चर्चा झाली.
या भेटीमुळे PCMC च्या जागतिक सहकार्याच्या प्रयत्नांना मोठा वेग मिळाला असून, आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी महापालिकेची तयारी अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.
🔹 महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा
या भेटीत गीर्ट यांनी PCMC चे प्रमुख अधिकारी—
-
मुख्य अभियंता (१) व पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी,
-
संयुक्त शहर अभियंता व नागरी वाहतूक विभाग प्रमुख बापूसाहेब गायकवाड,
-
Auto Cluster व PCSIC चे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य,
-
उद्योग सुविधा केंद्राचे प्रतिनिधी विजय वावरें,
-
CSR सेल प्रतिनिधी श्रुतिका मुंगी
यांच्यासह अनेक तज्ज्ञांशी संवाद साधला.
