Home Breaking News मावळमध्ये जनतेच्या प्रश्नांवर आमसभा घेण्याची जोरदार मागणी – शिवसेनेचे निवेदन तहसीलदारांना सादर

मावळमध्ये जनतेच्या प्रश्नांवर आमसभा घेण्याची जोरदार मागणी – शिवसेनेचे निवेदन तहसीलदारांना सादर

71
0
वडगाव : मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींतील व शहरी विभागातील प्रलंबित समस्या, नागरिकांचे प्रश्न आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर आमसभा घेण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख राजुभाऊ खांडभोर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
🔶 “आमसभा म्हणजेच जनतेच्या आवाजाला सरकारपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम”
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कारणाने आमसभेचं आयोजन केलं जातं. मात्र, त्या सभा केवळ औपचारिक राहू नयेत, तर त्यातून सामान्य जनतेच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, दलित आणि मागासवर्गीयांच्या अडचणी या सर्व गोष्टींवर ठोस तोडगा निघावा, हीच मावळ तालुका शिवसेनेची भूमिका आहे.
शिवसेनेने स्पष्ट केले की, प्रत्येक ग्रामसभेतील निर्णयांची अंमलबजावणी होणे, ग्रामपंचायतीतील कामकाज कायद्याच्या चौकटीत पार पडणे, आणि प्रत्येक शासकीय खात्याचा जबाबदार अधिकारी जनतेपुढे उत्तरदायी राहणे गरजेचे आहे.
🔷 खासदार, आमदार, जिल्हा परिषद अधिकारी यांची भूमिकाही महत्वाची
या निवेदनात मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार सुनील अण्णा शेळके, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी आणि सर्व खातेप्रमुख अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर तालुका आमसभेचे आयोजन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
 उपस्थित मान्यवर :
यावेळी युवा सेना अध्यक्ष राजेश वाघोले, मावळ लोकसभा युवा सेना अध्यक्ष विशाल हुळावले, संघटक मदन शेडगे, चंद्रकांत भोते, उपतालुकाप्रमुख राम सावंत, सोमनाथ कोंडे, विभाग प्रमुख सहादू बडेकर, नवनाथ हारपुढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.